Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • राज्यसभा में सदस्य बनाए जाएंगे राकेश सिन्हा, रघुनाथ महापात्रा, सोनल मान सिंह और रामशकल
  • NEWS FLASH: मुंबई: कांग्रेस नेता संजय निरुपम और बाबा सिद्दीकी ने ठीक किया गड्ढा
  • NEWS FLASH: पाकिस्तान: ब्लास्ट में मरने वालों की संख्या बढ़कर हुई 197
  • रेप का आरोपों के चलते गुजरात बीजेपी उपाध्यक्ष जयंती भानुशाली ने दिया इस्तीफा
  • NEWS FLASH: ढाका: गृह मंत्री राजनाथ सिंह ने बांग्लादेश की पीएम शेख हसीना से की मुलाकात
  • राष्ट्रपति ने किया राज्यसभा के लिए चार सांसदों को मनोनीत किया
  • अमित शाह का बयान, 2019 के चुनाव से पहले शुरू होगा राम मंदिर निर्माण- IANS
  • नवाज और मरियम के लौटने से पहले पाकिस्तान में 2 धमाके, 89 मरे और 180 से ज्यादा घायल
  • लाहौर में उतरा नवाज शरीफ का विमान, जल्द ही बेटी के साथ होंगे गिरफ्तार

दिव्यांगाचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढवावा - अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी

दिव्यांगाच्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करतांनाच त्यांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परेदशी यांनी येथे दिले. दिव्यांग व महिलांचा मतदान प्रक्रियेतील सहभागाबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी बोलत होते. उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) रामदास सिद्धभट्टी यांच्यासह अनेक अधिकारी-कर्मचारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, विशेष शिक्षक आदी यावेळी उपस्थित होते. ज्या ठिकाणी जास्त दिव्यांगांची संख्या जास्त आहे तिथे विशेष दुत देण्यात यावा. मतदान केंद्र तळमजल्यावर असणे अपेक्षित आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे मतदान केंद्र हे पहिल्या मजल्यावर असेल तर तेथे स्वयंसेवकांची नेमणूक करावी. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी असे निर्देश श्री. परदेशी यांनी दिले. दिव्यांग हा मतदान नोंदणी कुठेही करु शकतो, मात्र त्याचे नाव ज्या मतदार संघात असेल तेथेच त्याला मतदान करता येईल. आपल्या विभागातील दिव्यांगांना मतदानात सहभाग देण्यासाठी जनजागृती करण्यात यावी. त्यांना मतदानासाठी प्रेरित करावे व मतदानाची गोपनियता कायम राहील याची काळजी घ्यावी असे निर्देश श्री. सिद्धभट्टी यांनी दिले.

Leave A Comment