Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या स्थितीबाबत 12 एप्रिलला जनसुनावणी

राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या स्थितीबाबत जनसुनावणी दि. 12 एप्रिलला येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी 11 ते सायं. 5 या वेळेत होणार आहे. आयोगाचे अध्यक्ष एम.जी. गायकवाड (सेवानिवृत्त न्यायमूर्ती) यांच्यासह आयोगाचे सदस्य यावेळी उपस्थित राहतील. मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण जाणून घेण्यासंदर्भात विभागवार जनसुनावणी घेऊन व्यक्ती, संघटना व सामाजिक संस्थेमार्फत माहिती संकलित‍ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमरावती महसूल विभागांतर्गत ज्या व्यक्ती, संस्था, संघटनांना मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणासंबंधी आयोगासमोर निवेदन सादर करावयाचे आहे किंवा आपले म्हणणे मांडावयाचे आहे अशा व्यक्ती, संस्था, संघटनांनी लेखी पुराव्यासह व ऐतिहासिक माहितीसह दि.12 एप्रिलला आपले निवेदन सकाळी 11 ते 5 या वेळेत शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात सुनावणीचे वेळी आयोगासमोर सादर करावे, असे आवाहन आयोगाच्या सदस्य सचिवांनी केले आहे.

Leave A Comment