Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • राज्यसभा में सदस्य बनाए जाएंगे राकेश सिन्हा, रघुनाथ महापात्रा, सोनल मान सिंह और रामशकल
  • NEWS FLASH: मुंबई: कांग्रेस नेता संजय निरुपम और बाबा सिद्दीकी ने ठीक किया गड्ढा
  • NEWS FLASH: पाकिस्तान: ब्लास्ट में मरने वालों की संख्या बढ़कर हुई 197
  • रेप का आरोपों के चलते गुजरात बीजेपी उपाध्यक्ष जयंती भानुशाली ने दिया इस्तीफा
  • NEWS FLASH: ढाका: गृह मंत्री राजनाथ सिंह ने बांग्लादेश की पीएम शेख हसीना से की मुलाकात
  • राष्ट्रपति ने किया राज्यसभा के लिए चार सांसदों को मनोनीत किया
  • अमित शाह का बयान, 2019 के चुनाव से पहले शुरू होगा राम मंदिर निर्माण- IANS
  • नवाज और मरियम के लौटने से पहले पाकिस्तान में 2 धमाके, 89 मरे और 180 से ज्यादा घायल
  • लाहौर में उतरा नवाज शरीफ का विमान, जल्द ही बेटी के साथ होंगे गिरफ्तार

FB डेटा लीक प्रकरणी केम्ब्रिज अॅनालिटिकावर धाड; अधिकारी म्हणे, ही तर फक्त सुरुवात

फेसबूक डेटा चोरी प्रकरणात केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीच्या कार्यालयावर धाड टाकण्यात आली आहे. ही कारवाई ब्रिटनच्या माहिती आयुक्तालयासाठी काम करणाऱ्या अंमलबजावणी संचलनालयाने केली. माहिती आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी या कारवाई संदर्भात अधिकृत दुजोरा दिला. तसेच कार्यालवर धाड टाकणे ही कारवाईची केवळ सुरुवात आहे असे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रचाराची जबाबदारी याच कंपनीला दिली होती. केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीने फेसबूकच्या माध्यमातून 5 कोटी अमेरिकन मतदारांची खासगी माहिती चोरून 2016 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत वापरली असा आरोप आहे. यामुळे टाकली धाड ब्रिटिश माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या माहिती आयुक्त एलिझाबेथ डेनहॅम यांनी 7 मार्च रोजी केम्ब्रिज अॅनालिटिकाचे रेकॉर्ड्स तपासण्यासाठी आकडेवारी मागवली होती. पण, कंपनीने ती माहिती दिली नसल्याने त्यांच्या विरोधात कोर्टाचे आदेश काढण्यात आले. स्थानिक न्यायालयाने गुरुवारी याबाबतचे आदेश दिले. त्यानुसार, धाड टाकण्यात आली आहे. यासोबतच, कंपनीवर धाड टाकणे ही कारवाईची एक सुरुवात आहे. यातून फक्त पुरावे गोळा केले जात आहेत असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. काय आणि कसे काम करते केम्ब्रिज अॅनेलिटिका - केम्ब्रिज अॅनालिटिका ब्रिटनच्या लंडन येथील माहिती उपलब्ध करून देणारी संस्था असून ते निवडणुकीच्या काळात मतदारांची माहिती करार करून विकतात. राष्ट्राध्यक्ष आणि इतर निवडणुकींमध्ये या कंपनीला राजकीय पक्षांकडून मोठी मागणी आहे. - कंपनीने 2016 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराची जबाबदारी स्वीकारली होती.

Leave A Comment