Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

क्षेत्रीय प्रचार कार्यालय आणि अमरावती महानगरपालिकाच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनाचे आयोजन

नियमित डॉटस औषधोपचाराने क्षयरोग पूर्णपणे बरा होउ शकतो. त्याकरिता न घाबरता लोकांनी स्वता:हून क्षयरोगाच्या तपासणीसाठी पुढे यावे असे प्रतिपादन दस्तूर नगरच्या शहरी आरोग्य केंद्राच्या वैदयकिय अधिकारी डॉ सुषमा भगत यांनी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजित विशेष जनजाग्रुती कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय आणि शहरी आरोग्य केंद्र दस्तूर नगरच्यावतीने प्रभू कौलनी येथील मातोश्री कृष्णाबाई देशमुख विदयालयाच्या प्रांगणात विदयार्थ्यांमध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने विशेष प्रसिध्दी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री अंबादास यादव, वैद्यकिय अधिकारी डॉ सुषमा भगत, मुख्याध्यापक बी आर मोहोड, आरोग्य सेविका स्मिता इंगळे, फार्मासिट्स मोनिका वसूकर आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे डॉ भगत म्हणाले क्षयरोग ही अजूनही सार्वजनिक आरोग्याची मोठी समस्या आहे. आपल्या देशात दररोज ८०० पेक्षा जास्त म्हणजेच दर तीन मिनिटाला तीन व्यक्तीचा मुत्यु क्षयरोगाने होतो. क्षयरोगामुळे होणार्‍या मुत्युचे प्रमाण जास्त आहे. आणि यावर मात करण्यासाठी सरकारी दवाखान्यात मोफत तपासणी आणि डॉटस औषधपचार दिला जातो. जेणेकरून क्षयरोगावर नियंत्रण राखण्यास मदत होईल. क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव म्हणाले की, क्षयरोग हा मायकोबक्टेरियम नावाच्या जीवानूमुळे होतो. हा आजार माणसाला फार पूर्वीपासून माहीत असून प्रचीन काळी त्याला राजयक्ष्मा या नावाने संबोधले जायचे. क्षयरोग प्रामुख्याने फुफुसांना होत असला तरी तो शरीराच्या लसीकाग्रंथी, मेंदू, हाडे, मूत्रपिंड, यासारख्या अवयवांनासुद्धा होऊ शकतो. क्षयरोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. जेव्हा फुफुसाच्या क्षयरोगाणे आजारी असणारी व्यक्ति शिकते किंवा खोकते तेव्हा क्षयरोगच्या जिवाणूंचा प्रसार होतो. आजच्या जनजागृती पर कार्यक्रमातून मिळालेल्या माहिती द्वारे विदयार्थी, शिक्षक वर्गांनी लोकांमध्ये क्षयरोगा बद्द्ल असलेले गैरसमज, चुकिच्या रुढी, कल्पना व अंधश्रध्देचे निर्मूलन करण्याकरिता व रुग्णांना उपचारासाठी पुढे घेउन येण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले. जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांकरिता प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आले तसेच विदयार्थ्यांची क्षयरोग तपासणी व मोफत आयर्न फॉलिकच्या गोळ्या देण्यात आले. प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेते कू उत्कर्षा ताकसांडे, कू तेजल रामटेके, कू संस्कृती अनासाने, चेतन ध्रुवे, हर्ष बोरकर आणि प्रज्वल स्तूल आदि विदयार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते बक्षिस देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता इंगळे आणि आभार निलेश विधळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी आरोग्य सेविका कविता गुल्हाने, जया रंगारी, आरती बोरगमवार, आशा उज्ज्वला रताळे, विनोद तिरमारे, मयुरा कांडलकर, अतूल देशमुख, आरोग्य केंद्राचे कर्मचारी आणि विदयालयाचे शिक्षक व् कर्माचारी वृंदानी सहकार्य केले. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थीं उपस्थित होते.

Leave A Comment