Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

आधारकार्ड नोंदणीचे अधिकृत दर निश्चित

नवीन आधार कार्ड नोंदणी करणे, व कार्डातील दुरुस्ती करण्यासाठी शासकीय दर निश्चित करण्यात आले आहेत. नवीन आधार नोंदणी व मुलांचे (5 ते 15 वर्षापर्यंत) मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट विनामूल्य होईल, इतर अपडेट करणे 25 रुपये, डेमोग्राफिक अपडेट करणे 25 रुपये, आधार कार्ड शोधणे ब्लॅक ॲन्ड व्हाईट प्रिंट काढणे 10 रुपये, आधार कार्ड शोधणे व कलर प्रिंट काढणे 20 रुपये दर निश्चित केले आहेत. जिल्ह्यातील आधार केंद्र चालकांच्या कामकाजाबाबत काही तक्रारी असल्यास आपल्या तालुक्यातील तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार, जिल्हास्तरावरील माहिती तंत्रज्ञान कक्षाचे प्रफुल्ल मेहरे मो. 8999401945, भूषण ठाकरे मो. 9860707003 यांच्याशी संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.

Leave A Comment