Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
  • मल्ल्याच्या प्रत्यार्पणास लंडन कोर्टाची मंजुरी
  • उर्जित पटेल के बाद शक्तिकांत दास बने रिजर्व बैंक ऑफ इंडिया के नए गवर्नर

प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे थाटात लोकार्पण सुरक्षित- समृद्ध महाराष्ट्रासाठी सुसज्ज यंत्रणा

अमरावती : प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या निर्मितीने विभागातील पाचही जिल्ह्यातील गुन्हे तपासात सहाय्य होणार असून गुन्हे सिध्दीचे प्रमाण वाढणार आहे. विविध पायाभूत सुविधांसह सुरक्षित, समृद्ध महाराष्ट्रासाठी शासनाकडून राज्यात विविध ठिकाणीसुसज्ज यंत्रणा उभारली जात आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी येथे केले. प्रयोगशाळेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. खासदार आनंदराव अडसूळ, गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार डॉ. सुनील देशमुख, महापौर संजय नरवणे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, महासंचालक (न्यायीक व तांत्रिक) एस. पी. यादव, संचालक कृष्णा कुलकर्णी, विभागीय आयुक्त पियूष सिंह, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलीक, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, सा. बां. विभागाचे प्र. अधिक्षक अभियंता विवेक साळवे, प्रयोगशाळेचे उपसंचालक विजय ठाकरे आदी उपस्थित होते. श्री. पोटे-पाटील म्हणाले की, विकासात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून अनेक नव्या योजना व विकास कामे पूर्ण होत आहेत. पायाभूत सुविधा व सुरक्षितता यामुळे महाराष्ट्र गुंतवणूकीसाठी सर्वोत्तम राज्य बनले आहे. प्रयोगशाळेच्या निर्मितीमुळे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील तपास व न्याय यंत्रणांना सहाय्य होणार आहे. गुन्हे सिध्दतेचे प्रमाण वाढणार असून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल. प्रयोगशाळेच्या इमारतीची निर्मिती अद्ययावत व प्रशस्त आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी तंत्रज्ञांनी उपाय सुचविण्याबाबत आवाहनही त्यांनी केले. गृहराज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले, पुरावे गोळा करणे, त्यांचे जतन व गुन्हयाच्या निष्कर्ष प्रक्रियेसाठी प्रयोगशाळेची मोठी मदत तपास व न्याय यंत्रणेला होणार आहे. अभिनव तंत्रज्ञानामुळे पुराव्यात बदल करणे अशक्य होऊन, निष्पक्ष व पारदर्शी प्रक्रियेला सहाय्यभूत ठरणार आहे. सँपल प्राप्त झाल्यावर ४५ दिवसांत तपासणी अहवाल मिळणार आहे. शासन, अधिकारी व तंत्रज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही प्रयोगशाळा साकार होऊ शकली. प्रयोगशाळेच्या उभारणीमुळे अमरावतीची वैज्ञानिकनगरी म्हणून ओळख निर्माण होईल, अशी भावना खासदार श्री. अडसूळ यांनी व्यक्त केली. ध्येयाला वाहून घेणा-या माणसांमुळे अनेक चांगली कामे यशस्वी होतात. प्रयोगशाळेच्या उभारणीत श्री. ठाकरे व सहका-यांचे मोलाचे योगदान दिले, अशा शब्दांत आमदार श्री. देशमुख यांनी अधिका-यांचे अभिनंदन केले. उपसंचालक श्री. ठाकरे व श्री. साळवे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. राज्यात ४५ ठिकाणी मोबाईल फॉरेन्सिक लॅब श्री. श्रीवास्तव म्हणाले की, गुन्ह्याच्या ठिकाणी तत्काळ पोहोचून शास्त्रीयदृष्ट्या अचूक पद्धतीने पुरावे गोळा करण्याची पद्धती विकसित केली आहे. त्यासाठी राज्यात ४५ ठिकाणी मोबाईल फॉरेन्सिक लॅब सुरु करण्यात आल्या आहेत. डीएनए चाचणीला गती मिळण्यासाठी रॅपिड डीएनए यंत्रणाही देण्यात येणार आहे. श्री. यादव म्हणाले की, प्रयोगशाळा सुसज्ज होण्यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ठराविक गुन्ह्यांमध्ये पुरावे गोळा करणे अतिशय जिकिरीचे असते. ही प्रक्रियाही प्रयोगशाळेमुळे सुरळीत होणार आहे. प्रयोगशाळेबाबत… तीन विभागांसह उभारण्यात आलेली भव्य आणि सर्व उपकरणासह सुसज्ज असलेली इमारत शहराच्या वैभवात निश्चितच भर घालणारी आहे. या प्रयोगशाळेची विविध गुन्ह्यांच्या तपासात महत्‍त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. गृह विभागाने 20 कोटी रुपये खर्च करुन इमारतीचे बांधकाम केले आहे. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील गुन्ह्याच्या तपासकार्य आणि न्यायप्रक्रियेत फॉरेन्सिक लॅबचे सहाय्य महत्वाचे ठरणार आहे.या लॅबमध्ये असलेल्या अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने डीएनए तपासणी, बॉयोलॉजी, वन्यप्राण्यांची शिकार तपासणी, दारुबंदी, विषशास्त्र तपासणी तसेच सायबर गुन्हे इत्यादी तपासणी आणि अहवाल तातडीने पोलिस विभागाला कळविण्यात येणार आहे. या इमारतीच्या निर्मिती आणि उपकरणांच्या सुविधांसाठी सुमारे 19 कोटी रुपये खर्च आला आहे.

Leave A Comment