Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
  • मल्ल्याच्या प्रत्यार्पणास लंडन कोर्टाची मंजुरी
  • उर्जित पटेल के बाद शक्तिकांत दास बने रिजर्व बैंक ऑफ इंडिया के नए गवर्नर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन, भुमिपूजन

अमरावती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी, दि. 10 मार्च रोजी शहरातील विविध चार विकासकामांचे भुमिपूजन आणि उद्घाटन होणार आहे. जिल्हा न्यायालयचे उद्घाटन सकाळी 10 वाजता होईल. त्यानंतर जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या इमारतीतील 200 खाटांची विस्तारीत इमारत आणि चित्रा चौक ते नागपुरी गेटपर्यंतच्या उड्डाणपुलाचे भुमिपूजन आणि प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे (फॉरेंसिक लॅब) उद्घाटन होणार आहे. कॅम्प परिसरात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या न्यायालयाची भव्य इमारत स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. सहा मजली असलेल्या या इमारतीमध्ये प्रत्येक माळ्यावर सात ते आठ न्यायालये याप्रमाणे एकूण 32 न्यायालये राहतील. त्‍यासोबतच बार रुम, उपहार गृह, वाहनतळ, स्टोअररुम व रेकॉर्डरुम, प्रसाधनगृह आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहे. सुमारे 16 हजार 845 चौरस मीटर इमारतीच्या बांधकामास एकूण 47 कोटी 83 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. इमारतीमध्ये पाच लिफ्ट बसविण्यात आलेल्या असून एक लोखंडी फायर एस्केप जिना लावण्यात आला आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयाचे विस्तारीकरणांतर्गत 200 खाटांच्या इमारतीचे भूमीपुजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. 16 हजार 552 चौरस मीटर बांधकाम करण्यात येणार आहे. या तीन मजली इमारतीत बाह्यरूग्ण, अतिदक्षता कक्ष, अपघात कक्ष, लेबर वार्ड, शस्त्रक्रिया कक्ष, औषधी दुकान, रेडिओलॉजी कक्ष, हिरकणी कक्ष, पीएनसी, आयसीटीसी रुम, ब्लड बँक, डॉक्टरांचे निवास व्यवस्था, व्हीसी रुम, सेमीनार हॉल, मिटींग हॉल आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. रूग्णालयाच्या इमारतीसाठी सुमारे 38 कोटी रूपये खर्च येणार आहे. या इमारतीचे काम दोन वर्षात पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चित्रा चौक ते नागपुरी गेटपर्यंत राज्य मार्ग क्रमांक 14 वर उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भुमिपूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नागपुरी गेटपासून शहराच्या चारही दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाची लांबी 1 हजार 543 मीटर असून पुलाच्या दोन्ही बाजूस काँक्रीट रस्त्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. या संपूर्ण स्थापत्य बांधकामास 58 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील हा परिसर मुख्य बाजारपेठेमुळे वर्दळीचा आहे. उड्डाणपुलामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे. हा पुल दोन वर्षात बांधून पूर्ण करण्यात येणार आहे. प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या नुतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तीन विभागांसह उभारण्यात आलेली भव्य आणि सर्व उपकरणासह सुसज्ज असलेली इमारत शहराच्या वैभवात निश्चितच भर घालणारी आहे. या प्रयोगशाळेची विविध गुन्ह्यांच्या तपासात महत्‍त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. गृह विभागाने 20 कोटी रुपये खर्च करुन इमारतीचे बांधकाम केले आहे. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील गुन्ह्याच्या तपासकार्य आणि न्यायप्रक्रियेत फॉरेन्सिक लॅबचे सहाय्य महत्वाचे ठरणार आहे. या लॅबमध्ये असलेल्या अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने डीएनए तपासणी, बॉयोलॉजी, वन्यप्राण्यांची शिकार तपासणी, दारुबंदी, विषशास्त्र तपासणी तसेच सायबर गुन्हे इत्यादी तपासणी आणि अहवाल तातडीने पोलिस विभागाला कळविण्यात येणार आहे. या इमारतीच्या निर्मिती आणि उपकरणांच्या सुविधांसाठी सुमारे 19 कोटी रुपये खर्च आला आहे.

Leave A Comment