Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
  • मल्ल्याच्या प्रत्यार्पणास लंडन कोर्टाची मंजुरी
  • उर्जित पटेल के बाद शक्तिकांत दास बने रिजर्व बैंक ऑफ इंडिया के नए गवर्नर

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत राज्याचा सन 2018-19 चा अर्थसंकल्प सादर

मुंबई-अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत राज्याचा सन 2018-19 चा अर्थसंकल्प सादर केला. मुनगंटीवारांच्या कार्यकाळातील चौथा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी सिद्धिविनायक दर्शन घेतले होते. अर्थसंकल्प कृषी केंद्रीत असून शेती आणि शेतकर्‍यांसाठी भरघोस तरतूद करण्‍यात आली आहे. सोबतच सागरी शिवस्मारकासाठी 300 कोटी आणि इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 150 कोटींची तरतूद करण्‍यात आली असून कार्यारंभा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. महत्त्वाच्या तरतुदी... -जीएसटी लागू झाल्यापासून राज्यात 5 लाख 32 हजार नव्या करदात्यांची नोंदणी - सातव्या वेतन आयोगाबाबात कोणतीही घोषणा नाही - लांज्यात नवीन पर्यटन स्थळ - पु.ल देशपांडे आणि गदिमांच्या शताब्दीसाठी 5 कोटींचा निधी - गणपतीपुळे विकासासाठी 20 कोटी - वेंगुर्ल्यात पर्यटनासाठी पहिली भारतीय पाणबुडी उपलब्ध होणा - दिव्यांगांना मोबाइल स्टॉल्स उभारून देण्यासाठी 25 कोटींची तरतूद - कुपोषणाच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी 21 कोटी 19 लाख रुपयांची तरतूद - महाराष्ट्रात 300 मेगावॅट वीजनिर्मितीचे प्रकल्प सुरू करण्यात येणार. ग्रीन सेस फंडातून 350 कोटींची तरतूद. - विद्यावेतन 4 हजार रुपयांपर्यंत वाढवले. - 4509 किमीवरून 3 वर्षांत 15404 किमीचे राष्ट्रीय महामार्ग बनवले. - सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानासाठी 900 कोटी रू. निधीची तरतूद - संकटग्रस्त महिलांसाठी स्वाधार गृहे ही योजना राबविण्यासाठी 20 कोटी रू. निधीची तरतूद. - हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेचे बळकटीकरण व श्रेणीवर्धन करण्यासाठी 3 कोटी 50 लक्ष रू. निधीची तरतूद. - सिंधूदुर्ग जिल्ह्यामध्ये अंदाजे 20 कोटी रू. किमतीचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय स्थापन करणार. - माता व बाल मृत्युचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी राबविण्यात येणार्‍या प्रधान मंत्री मातृवंदना योजनेसाठी 65 कोटी रू. निधीची तरतूद. - महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अभियानासाठी 576 कोटी 5 लक्ष रू. निधीची तरतूद. - केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 964 कोटी रू. निधीची तरतूद. - सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानासाठी 900 कोटी रू. निधीची तरतूद. - स्मार्ट सिटी अभियानांतर्गत निवड झालेल्या राज्यातील 8 शहरांसाठी 1 हजार 316 कोटी रू. निधीची तरतूद. नागरी क्षेत्रातील पाणी पुरवठा व मल:निस्सारण ह्यासाठी राबविण्यात येणा-या अमृत योजनेसाठी 2 हजार 310 कोटी रू. निधीची तरतूद. - कंपोस्ट खत निर्मितीला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर हरित महासिटी कंपोस्ट ह्या ब्रँडला अनुदान देण्याचा निर्णय. ह्यासाठी 5 कोटी रू. निधीची तरतूद. - भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान तसेच विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, सांगली मार्डी, जि. उस्मानाबाद ह्यांच्या मार्फत केल्या जात असलेल्या कौशल्य विकासाच्या कामासाठी प्रत्येकी रू. 2 कोटींचे अनुदान. - संत्रा प्रक्रिया उद्योगांतर्गत संत्र्याची उत्पादकता व दर्जा वाढविण्यासाठी नागपूर, अमरावती, अकोला ह्या तीन जिल्ह्यांत पंजाब राज्याप्रमाणे "सिट्रस इस्टेट" ही संकल्पना राबविणार. त्यासाठी 15 कोटी इतक्या रू. निधीची तरतूद. - श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावण झालेले रामटेक तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 150 कोटींची तरतूद - सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संवर्धनासाठी 10 कोटी तरतूद - सिरोंचा येथे जीवाश्म संग्रहालयासाठी 5 कोटी तरतूद - मॅग्नेटिक महाराष्ट्रअंतर्गत देशांतर्गत व परकीय गुंतवणूकदारांकडून 4 हजार 106 सामंजस्य करार प्राप्त. ह्याचे मूल्य रू. 12 लाख 10 हजार 464 कोटी असून सुमारे 37 लक्ष इतका रोजगार अपेक्षित. -गर्भवती व स्तनदा मातांच्या पोषण आहारासाठी- 15 कोटींची तरतूद स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी... - घनकचरा व्यवस्थापन ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी 1526 कोटींची तरतूद - स्मार्टसिटीसाठी निवड झालेल्या 8 शहरांसाठी 1316 कोटींचा निधी - नगर पंचायती, नगर परिषदा, ड वर्ग महापालिकांच्या पायाभूत सुविधांसाठी 900 कोटींचा निधी - राज्यातील न्यायालयांच्या इमारती व न्यायाधीशांच्या निवासांसाठी 700 कोटी 65 लाख रुपयांची तरतूद - संत गोरोबा काका महाराष्ट्र माती कला महामंडळ स्थापणार, त्यासाठी 10 कोटींची तरतूद - औरंगाबाद येथील सरस्वती भुवन जन्मशताब्दीसाठी 2 कोटींचे अनुदान - संत्र्याची लागवड आणि उत्पादकता वाढवण्यासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद - कायदा व सुव्यवस्था... पोलिस दलाचे आधुनिकिकरण व बळकटीकरणासाठी गृह खात्याला 13385 कोटी 3 लाख रुपयांचा निधी - तक्रारींचा लवकर निपटारा करण्यासाठी ई गव्हर

Leave A Comment