Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
  • मल्ल्याच्या प्रत्यार्पणास लंडन कोर्टाची मंजुरी
  • उर्जित पटेल के बाद शक्तिकांत दास बने रिजर्व बैंक ऑफ इंडिया के नए गवर्नर

अल्पवयीन मुलीचा विवाह; जाब विचारणाऱ्यास मारहाण

आठवी वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा लग्नसोहळा १२ मार्च रोजी नियोजित ठरला होता. या लग्नाला विरोध करत जाब विचारणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बीडमधील गेवराई तालुक्यात घडली. तुम्ही अल्पवयीन मुलीचा विवाह का करता म्हणून गावातीलच संदीप निवृत्ती चौधरी (वय-३२) तरुणाने जाब विचारला. यावर मुलीच्या नातेवाईकांनी लोखंडी पाईप, काठ्यांनी संदीप याला बेदम मारहाण केली. ही घटना गेवराई तालुक्यातील तळेवाडी गुरुवारी रात्री ८च्या सुमारास घडली. या मारहाणीत चौधरी गंभीर जखमी झाला असून तो रात्रभर बेशुद्धावस्थेत घरातच पडून होता. शुक्रवारी सकाळी गावातीलच काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Leave A Comment