Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
  • मल्ल्याच्या प्रत्यार्पणास लंडन कोर्टाची मंजुरी
  • उर्जित पटेल के बाद शक्तिकांत दास बने रिजर्व बैंक ऑफ इंडिया के नए गवर्नर

बाराशे जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

कचराप्रश्नी बुधवारी झालेल्या आंदोलनात नागरिकांनी पडेगाव, मिटमिटा भागात पोलिसांवर दगडफेक केली. कचऱ्याच्या गाड्या जाळल्या. याप्रकरणी तब्बल बाराशे आंदोलकांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी, तर तीनशे जणांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी धरपकड करत दगडफेक करणाऱ्या २७ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी छावणीचे पीएसआय सचिन मिरधे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाराशे अनोळखी आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दंगल करणे, दगडफेक करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये २४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच महापालिकेचे उपअभियंता देविदास पंडित यांनी दिलेल्या तक्रारीवरून तीनशे अनोळखी आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, रस्ता अडवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी पडेगाव मिटमिटा भागात नागरिकांनी कडकडीत बंद पाळला.

Leave A Comment