Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
  • मल्ल्याच्या प्रत्यार्पणास लंडन कोर्टाची मंजुरी
  • उर्जित पटेल के बाद शक्तिकांत दास बने रिजर्व बैंक ऑफ इंडिया के नए गवर्नर

१३ कोटी वृक्षलागवड नियोजनाबाबत प्रशासनाकडून चर्चा

अमरावती, दि .११ : ४ कोटी वृक्षलागवडीच्या यशस्वी अभियानानंतर पुढील वर्षी १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. त्या अनुषंगाने विविध विभागांच्या अधिका-यांची बैठक विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्य वनसंरक्षक डॉ. प्रवीण चव्हाण, सामाजिक वनीकरणाचे वनसंरक्षक आर. के. वानखेडे, उपवनसंरक्षक हेमंत मीना यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. श्री. सिंह यांनी १३ कोटी वृक्ष लागवडीबाबत करावयाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. चव्हाण यांनी आढावा बैठकीमध्ये पावसाळ्यात ४ कोटी वृक्ष लागवडीमध्ये साध्य केलेले उद्दिष्ट पुढील वर्षासाठी शासनाकडून देण्यात आलेले उद्दिष्ट याबाबत माहिती दिली. आवश्यक रोपांची संख्या व लँड बँक याबाबतही त्यांनी सांगितले. विभागात गेल्या वेळचे ५० लाख ९९ हजार झाडांचे उद्दिष्ट होते. त्यात ५९ लाख९९ हजार रोपांची लागवड करण्यात आली. २०१८ च्या पावसाळ्यात १ कोटी ४२ लाख २९ हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी तयारी करावी, तसेच ग्रीन आर्मी सदस्य नोंदणीचे उद्दिष्टही पूर्ण करावे, असे निर्देश श्री. सिंह यांनी यावेळी दिले.

Leave A Comment