Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
  • मल्ल्याच्या प्रत्यार्पणास लंडन कोर्टाची मंजुरी
  • उर्जित पटेल के बाद शक्तिकांत दास बने रिजर्व बैंक ऑफ इंडिया के नए गवर्नर

थेट विक्रीमुळे संत्रा उत्पादकांना लाभ

अमरावती: शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी थेट विक्रीचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभाग यांच्या प्रयत्नांतून शेतकरी कंपन्या स्थापन करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. या प्रयत्नांना यश मिळून आता नामांकित कंपन्यांकडून जिल्ह्यात उत्पादित होणारा संत्रा खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा व कृषी प्रशासनाकडून शेतकरी कंपनी, शेतकरी गट व खरेदीदार यांची सभा घेऊन सतत पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात संत्र्याची थेट विक्री सुरू झाली आहे. बिग बझार, रिलायन्स, मदर डेअरी अशा प्रसिद्ध कंपन्या शेतक-यांकडून थेट संत्रा खरेदी करण्यास उत्सुक आहेत. जिल्ह्यातील वरुड येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी यांनी बंगळुरु येथे बिग बझार या कंपनीला 8 मेट्रिक टन संत्रा विक्री केला आहे. त्यांना स्थानिक बाजार भावापेक्षा 7 ते 8 हजार प्रति मेट्रिक टन दर जास्त मिळाला आहे. अचलपूर येथील कृषी समृध्दी उत्पादक कंपनी यांच्याकडून 53 मेट्रिक टन संत्रा या आठवड्यात थेट विक्रीचे नियोजन आहे. तसेच जिल्ह्यात उत्पादित होणारी हळद, पांढरा कांदा आदी पीकांसाठीही संस्था खरेदीदाराकडे थेट विक्री करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेतमाल थेट विक्रीमध्ये शेतकरी गट व शेतकरी कंपनीमार्फत जास्तीत -जास्त शेतक-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केलेआहे.

Leave A Comment