Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

खरेदी केंद्रावर पीकांची नोंदणी करण्याचे आवाहन

अमरावती: खरीप हंगामातील पीकपेरा क्षेत्रानुसार पीकांची नोंदणी खरेदी केंद्रावर करुन घेण्याचे आवाहन स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा विपणन अधिकारी यांनी केले आहे. हंगाम 2017-18 मध्ये राज्यात नाफेडच्या वतीने केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने तेलबिया व कडधान्याची खरेदी प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे. त्याकरिता दि. 3 ऑक्टोबरपासून राज्यात शेतक-यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. शेतक-यांनी खरीप हंगामातील पीकपेरा क्षेत्रानूसार 7/12 च्या उता-याची मूळ प्रत, आधारकार्ड व बँक खाते पासबुकाच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, मोबाईल नंबर आदी माहितीसह खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे कळविण्यात आले आहे. खरीप हंगामातील पीकासाठी एकदाच सर्व पीकांची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर खरेदी सुरु झाल्यावर व प्रत्यक्ष धान्य आणावयाच्या वेळी शेतक-यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. मूग व उडीद यांची खरेदी केंद्रे नाफेडची मंजुरी मिळताच सुरु होतील. तत्पूर्वी सर्व शेतकरी बांधवानी पीकांची नोंदणी खरेदी केंद्रावर करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे

Leave A Comment