Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

वर्ध्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी

मुख्यमंत्री फडवनीस आज वर्ध्यामध्ये एका कार्यक्रमात भाषण देत असतानाच शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. भाजप आणि संघाशी जवळीक असलेल्या टालाटुले नावाच्या कापूस व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे कापूस खरेदीचे पैसे बुडवलेत. आमच्या शेतमालाचे हे हक्काचे पैसे असून सरकारने हस्तक्षेप तात्काळ ही रक्कम आम्हाला मिळवून द्यावी, अशी मागणी या आंदोलकांची होती हे प्रकरण लवकरच मिटवू, असं मुख्यमंत्र्यांनी घोषणा करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या भाषणातूनच सांगितलं. या घोषणाबाजीमुळे सभास्थानी काही क्षण गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, पण नंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी भाषण पुन्हा सुरु केलं, टालाटुले हा कापूस व्यापारी भाजप आणि संघाशी जवळीक असलेला स्थानिक नेता आहे. त्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून वर्ध्यातल्या पासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं पेमेंटच केलेलं नाही. पीडित शेतकऱ्यांनी याविरोधात मध्यंतरी नागपूरच्या संघ मुख्यालयासमोरही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. पण सरकारने त्याची दखल घेतल नाही. म्हणून मग आज सरतेशेवटी या आंदोलकांनी थेट मुख्यमंत्र्यांच्याच सभेत घोषणाबाजी केलीय. शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या या व्यापाऱ्याला भाजपचं सरकारच पाठिशी घालत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

Leave A Comment