Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

केंद्र व राज्य सरकारवर टीका, दिनकरन यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

नीट परीक्षेवरुन केंद्र व राज्य सरकारवर टीका करणारे टी.टी.व्ही दिनकरन यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकरन यांच्या समर्थकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात पत्रकांचे वाटप केले होते. तामिळनाडूतील अण्णाद्रमुकचे बंडखोर नेते आणि शशिकला यांचे पुतणे दिनकरन यांनी नीट परीक्षेवरुन केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली होती. केआरएस सरवानन यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून दिनकरन यांच्यासह ३६ जणांविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली. मोदी आणि पलानीस्वामी यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पलानीस्वामी यांच्या मतदारसंघातच पत्रकांचे वाटप करण्यात आल्याने दिनकरन यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे समजते. मात्र या पत्रकांमध्ये नेमके काय म्हटले होते हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी दिनकर आणि अन्य ३६ जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे

Leave A Comment